पुणे हादरले.. ‘ तो मी नव्हेच ‘ पैसे दिले कोणाला ?

शेअर करा

पुणे शहरात फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून माझ्या भारतातील एका मित्राच्या पूर्ण कुटुंबाला कोरोना झालेला आहे आणि त्याला काही पैशाची गरज आहे मी सांगतो त्या खात्यावर तात्काळ पैसे पाठव. मी तुला इथून लगेच डॉलर पाठवतो असे सांगत एका व्यक्तीला तब्बल 26 लाखांना चुना लावण्यात आलेला आहे. पीडित व्यक्ती हे ज्येष्ठ नागरिक असून तात्काळ विश्वास ठेवणे त्यांना चांगलेच महागात पडलेले आहे.

सदर प्रकरणी 68 वर्षीय नागरिकाने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादी सुखवस्तू कुटुंबातील आहेत आणि त्यांच्या मुलाचा व्यवसाय आहे. त्यांचा भाऊ अमेरिकेत राहतो १० ऑक्टोबर २०१९ रोजी एका सायबर चोरट्याने फिर्यादीच्या भावाचा व्हाट्सअप प्रोफाइल असलेल्या एका क्रमांकावरून मेसेज द्वारे संपर्क साधला होता. त्यांना संशय येऊ नये म्हणून नेटवर्क प्रॉब्लेम असल्याचे कारण सांगत त्यांनी आपला नवीन नंबर आहे असे सांगून फिर्यादी यांना आपल्या जाळ्यात ओढले खरोखरच समोर आपला भाऊ आहे असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी संवाद सुरू ठेवला.

समोरील व्यक्तीने माझ्या एका मित्राच्या पूर्ण कुटुंबाला कोरोना झालेला आहे. त्याला पैशाची नितांत गरज आहे असे सांगत पाच लाख रुपये नितीन दहिया नावाच्या एका व्यक्तीच्या खात्यावर भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी तसे पैसे भरले त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या व्हाट्सअप मेसेजवर त्यांच्या खात्यात डॉलर भरले आहे याचा स्क्रीन शॉट पाठवला त्यामुळे फिर्यादी यांना व्यवहार व्यवस्थित होतो आहे असा भास झाला.

त्यानंतर चोरट्यांनी 13 ऑक्टोबरपर्यंत पाच ते सहा वेळा असे करत तब्बल 26 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांवर भरून घेतले. काही कालावधीत भावाशी प्रत्यक्ष संपर्क झाल्यावर हा प्रकार’ मी करायला सांगितलाच नाही ‘ असे सांगितल्यावर फिर्यादी यांच्या पायाखालील वाळू सरकली आणि त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत संशयितांच्या विरोधात तक्रार दिली.


शेअर करा