पुण्यातील ‘ अतिजागरुक नेतृत्वाचा ‘ आगाऊपणा अन फुकटच झाली मारहाण

शेअर करा

जागरूक नागरिक असणे हे एका चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे मात्र अनेकदा अति जागरुकता देखील घातक ठरू शकते अशीच एक घटना पुण्यात समोर आलेले असून कर्वेनगर येथे मंगळवारी हा प्रकार घडलेला आहे. मानसिक उपचारासाठी एका तरुणीला घेऊन जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काहीजणांनी अपराधी समजून जोरदार मारहाण केली आहे मात्र डॉक्टरांनी खुलासा केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

कर्वेनगर परिसरातील विकास चौक येथे एका 20 वर्षीय तरुणीला काहीजण जबरदस्तीने नेत आहेत त्यावेळी ती तरुणी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करते आहे, हे लक्षात आल्यावर काही जागरूक नागरिक यांनी सुरुवातीला या तरुणांना धमकावयाला सुरू केले मात्र तीन चार तरुण असल्याने त्यांनी या नागरिकांकडे दुर्लक्ष केले त्यावेळी परिसरातील ‘ एक जाणते नेतृत्व आणि त्यांचे कार्यकर्ते ‘ यांनी या तरुणांना दमदाटी करण्यास सुरू केली आणि त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत आले आणि या तीन चार तरुणांना जोरदार मारहाण करण्यात आली.

प्रकरण शांत झाल्यानंतर हे तरुण वैद्यकीय कर्मचारी असल्याचे समोर आले आणि त्यांनी या तरुणीवर मानसिक उपचार सुरू असून तिला पाषाण येथील एका सेंटरमध्ये आम्ही घेऊन चाललो होतो. पुढे आमची रुग्णवाहिका उभी आहे मात्र ती आमच्या सोबत येत नव्हती म्हणून तिला इंजेक्शन दिले आणि नेत आहोत असे सांगितले त्यानंतर या जाणत्या नेतृत्वाने कर्वेनगर पोलीस चौकीला फोन लावून पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले आणि मुलीच्या पालकांना देखील बोलावून घेतले त्यावेळी या तरुणांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे समजल्यानंतर हे ‘ जाणते नेतृत्व आणि आणि त्यांचे कार्यकर्ते ‘ चांगलेच खजील झाले होते.


शेअर करा