पुण्यात खळबळ , ‘ आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. ‘

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आपला खून करण्याचा प्लॅन केलेला आहे असा समज झाल्यानंतर एका तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने आणि कोयत्याने मारून गंभीर जखमी केले आहे. आरोपींपैकी चार जणांना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दोन जण फरार आहेत. सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावातील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संजय महादेव बंडगर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून ऋषिकेश तांबे, महेश काळे, अविनाश सांबरे आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी त्यातील चार जणांना अटकही केली आहे.

संजय बंडगर हा आपला खून करणार आहे असा संशय ऋषिकेश तांबे याला आलेला होता त्यामुळे त्याने खून करण्याआधीच आपणच त्याला संपवून टाकू यासाठी सहा जणांचे टोळके जमवले आणि त्यानंतर ऋषिकेश तांबे, महेश काळे आणि अविनाश सांबरे यांनी त्याला गाठत दांडके आणि कोयत्याने मारहाण केली. संजय बंडगर यांनी यानंतर हवेली पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.


शेअर करा