पुण्यात खळबळ..जुन्या प्रेमप्रकरणातून पाळत ठेवली अन शाळेजवळ गाठले

शेअर करा

एक खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती इथे समोर आली असून जुन्या प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे. शशिकांत कारंडे असे हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून बारामती शहरातील श्रीरामनगर येथे एका शाळेच्या आवारात ही हत्या संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेली आहे. शशिकांत कारंडे हे मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे असे सांगण्यात आले आहे.

शशिकांत कारंडे यांचा मुलगा शेखर याच्यावर देखील काही दिवसांपूर्वी तीन जणांनी हल्ला केला होता. शेखर हा प्रेमप्रकरणात अडथळा आणत आहे म्हणून वारंवार त्याला धमकावण्यात देखील आले होते त्यातूनच शेखर यांचे वडील शशिकांत कारंडे यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झालेले असून त्यामध्ये शशिकांत यांच्यावर कोयत्याने वार करत असताना हल्लेखोर दिसून येत आहेत.

मयत शशिकांत यांचा मुलगा शेखर कारंडे यांना काही महिन्यांपूर्वी हल्ल्यातील मुख्य आरोपीच्या प्रेयसीसोबत बोलताना आरोपीने पाहिलेले होते त्यामुळे आपण आणि आपली प्रेयसी यांच्यामध्ये शेखर कारंडे हा येत आहे असा आरोपीचा समज झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने दोन मित्रांसोबत शेखरवर हल्ला केला होता आणि याच दरम्यान सदर मुली पासून लांब राहण्याची धमकी देखील दिली होती. शेखर हल्ल्यात बचावल्यामुळे आरोपीने अखेर शेखरच्या वडिलांवर हल्ला केला आणि त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. पोलीस तपासात शेखर आणि त्यांचे वडील यांच्यावर आरोपींनी पाळत ठेवली होती आणि शशिकांत कारंडे हे मुलीला शाळेत आणण्यासाठी गेलेले असताना आरोपींनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेतला.


शेअर करा