पुण्यात खळबळ..स्वारगेटवर येताच ‘ अँटिकरप्शनचे पोलिस ‘ मात्र पुढे

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पुण्यात समोर आली असून नांदेडमधून पुणे येथे सोने खरेदीसाठी आलेल्या सराफ व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्याला आपण अँटी करप्शनचे पोलीस असल्याची बतावणी करत पिस्तुलाच्या धाकाने त्याचे अपहरण केले आणि आणि त्याचे हात-पाय बांधून तब्बल 17 लाख 58 हजार रुपये लुटले, अशी घटना समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मधुरम सत्यनारायण सोनी ( वय २७ राहणार गंगा सिटी नांदेड ) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली असून 6 मार्च रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले आहे मात्र पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांचा नांदेड येथे सराफी व्यवसाय आहे. सोने खरेदी करण्यासाठी त्यांनी त्यांचा कर्मचारी असलेला शंकर भालेराव यांना 6 मार्च रोजी पुण्यात पाठवले होते. 7 मार्च रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास ते पुण्यात उतरले असताना स्वारगेट येथील वेगा सेंटर समोर एका कारमधून चार जण आले आणि आम्ही अँटिकरप्शनचे पोलिस असल्याची बतावणी केली आणि शंकर यांना पिस्तूल सारख्या शस्त्राचा धाक दाखवत जबरदस्तीने कारमध्ये बसवले.

कारमध्ये बसवल्यानंतर त्यांचे हात-पाय आणि तोंड चिकटपट्टीने बांधत त्यांच्याकडील 17 लाख 58 हजार रुपयांची रोकड त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यानंतर शंकर यांना अज्ञात स्थळी सोडून दिले. शंकर यांनी मालक सोनी यांच्याशी संपर्क करून त्यांच्यासोबत झालेली ही घटना मालकाला कथन केली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून संशयितांनी भालेराव यांचा नांदेड येथूनच पाठलाग केला असण्याची दाट शक्यता आहे. सदर प्रकरणी तपास सहायक निरीक्षक अमोल रसाळ हे करत आहे


शेअर करा