पुण्यात चक्क दुकानदाराची ग्राहक महिलेला अन तिच्या पतीला मारहाण

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पिंपरी येथे समोर आलेला आहे. एका दुकानात स्पोर्ट शूज घेण्यासाठी गेलेल्या महिलेला आणि तिच्या पतीला दुकानदारांने चक्क मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे. महिलेला अश्लील शिवीगाळ करत दुकानदाराने तिचा विनयभंग केला आणि ठार मारण्याची धमकी दिली. 30 तारखेला सकाळी गुरुद्वारा रस्ता येथील होंग कोंग स्पोर्टस शॉप इथे हा प्रकार घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जयप्रकाश वासवानी ( राहणार गुरुद्वारा रस्ता पिंपरी ) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव असून त्याच्या विरोधात 44 वर्षीय ग्राहक असलेल्या महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. पीडित महिला ह्या पतीसोबत स्पोर्ट शूज खरेदी करण्यासाठी गेलेल्या असताना त्यांनी स्पोर्ट शूज खरेदी केले आणि त्यानंतर पैसे देखील दिले. आपण दिलेले पैसे आणि स्पोर्ट शूजवर असलेली किंमत यात फरक असल्याचे लक्षात आल्यावर राहिलेला फरक त्यांनी दुकानदाराला परत मागितला मात्र यावरून दुकानदाराचा संताप अनावर झाला आणि त्याने चक्क महिलेला आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात दाखल होत त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.


शेअर करा