पुण्यात जोडपे टेकडीवर फिरायला गेले खरे मात्र घडला ‘ धक्कादायक ‘ प्रकार

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून पुणे इथे टेकडीवर फिरायला जाणे एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडलेले आहे . सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या एका जोडप्याला तिघा चोरट्यांनी अडवले आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी केली. तरुणाने नकार देताच त्यांना हाताने व लाकडाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील १ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार हे त्यांच्या मैत्रिणीसह सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेले असताना तिघे जण तेथे आले. त्यांनी या दोघांना थांबवून फिर्यादी यांना हाताने व लाकडाने मारहाण केली. त्यांच्या मैत्रिणीच्या कानाखाली जोरात मारुन जीवे मारण्याची धमकी दिली . मैत्रिणीसह फिर्यादीला धमकावत त्यांनी २५ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपयांचे दागिने, २ मोबाईल, चांदीची अंगठी, २ हजार ३०० रुपये, पाकीट, त्यातील आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असा १ लाख ७ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

चिंचवड येथे राहणाऱ्या एका ३४ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून घटना सुस खिंडीतील टेकडीवर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोळी अधिक तपास करीत आहेत.


शेअर करा