पुण्यात पत्नी साथीदारांसोबत पतीला एकांतात घेऊन गेली आणि ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे शहरानजीक पिंपरी येथे उघडकीला आली आहे. सातत्याने छळ करणाऱ्या पतीचा साथीदारांना मदतीला घेऊन पत्नीने खून केला आहे आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट देखील लावलेली आहे. देहूरोड येथे हा प्रकार उघडकीला आला असून 30 जानेवारी रोजी ही घटना रात्री घडलेली आहे.

आकाश अशोक गोरखे असे खून झालेल्या पतीचे नाव असून त्याची पत्नी ज्योती आकाश गोरखे ( वय 19 ) आणि तिचे साथीदार सोने उमेश जगरे ( वय 31) रवि धनु राठोड ( वय 29 राहणार देहूरोड ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अक्षय लोंढे ( राहणार जाधव वाडी चिखली ) रामविजय महतो ( राहणार बिहार ) यांच्यासह आणखी एक जणावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस हवलदार बळीराम चव्हाण यांनी 12 तारखेला याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात आकाश गोरखे यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणी पोलीस तपास करत असतानाच पत्नीने त्याचा काटा काढण्याची माहिती समोर आल्याने पोलीस देखील हादरून गेले. आकाश गोरखे हा आरोपी पत्नी हिला सातत्याने मारहाण करून तिचा छळ करत होता त्यामुळे अखेर वैतागून आरोपी यांनी आकाश याचा खून करण्याचा प्लॅन केला.

आरोपी यांनी 30 जानेवारी 2022 रोजी रात्री अकरा वाजता आकाश बोडके याला देहू रोड कमान येथील येथून एका अज्ञात ठिकाणी नेले आणि तिथे त्याला मारहाण करत त्याचा खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट देखील लावली मात्र तपासादरम्यान पोलिसांना हा प्रकार पत्नीहीने केला असल्याची कुणकुण लागली आणि तिचा गुन्हा उघड झाला.


शेअर करा