पुण्यात वडिलांच्या मित्राने ब्लॅकमेल करत ‘ वेळोवेळी ‘ , पीडिता म्हणतेय की ?

शेअर करा

महाराष्ट्रात पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून वडिलांच्या मित्राने साथीदारांच्या मदतीने आपल्या सोबत केलेल्या शरीरसंबंधाचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आपल्याला ब्लॅकमेल केले तसेच तिचे रो- हाऊस जबरदस्तीने विकायला लावून पैसे देखील हडप केली, अशी एक तक्रार पोलिसात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चाळीस वर्षीय पीडित महिला ही फुलेनगर येथे राहत असून तिने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पुरुषोत्तम लाल बुटानी ( राहणार खेसे पार्क लोहेगाव ) आणि वासुदेव पाटील ( राहणार खेसे पार्क लोहेगाव ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकार 2012 पासून सुरू होता असे देखील पीडितेचे म्हणणे आहे.

पुरुषोत्तम बुटानी हा फिर्यादी यांच्या वडिलांचा मित्र आहे. त्याचे आणि फिर्यादी यांचे 2012 पासून प्रेमसंबंध होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते त्यानंतर त्यामुळे बुटानी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना लोहगाव, बाणे, वाघोली परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेऊन त्यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले तसेच त्यांच्यासोबत असलेल्या वासुदेव पाटील याने या संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले. त्यानंतर या दोघांनी महिलेला तिच्या नावावर असलेला रोहाऊस विकून टाक असे देखील सांगितले आणि तिला एक दुकान आणि फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले.

महिलेने विरोध केला असता त्यांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रोहाऊसच्या कागदपत्रावर पीडित महिलेच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या आणि परस्पर रोहाऊस विकले मात्र त्यातील पैसे तिला दिले नाहीत आणि दुकान आणि फ्लॅटदेखील त्यांनी दिला नाही त्यामुळे पीडित महिलेला आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली. फिर्यादी यांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करत फसवणूक केली म्हणून फिर्यादी महिलेने विमानतळ पोलिसात धाव घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा