‘ पैसा अन मैत्रिणी बस ‘ , इंजिनीअर तरुणांनी सुरु केला होता ‘ हा ‘ उद्योग मात्र अखेर ..

शेअर करा

अधिक पैसे मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही . नाशिक इथे चक्क आपल्या मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्यासाठी तब्बल 56 चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल तीन वर्षे ते पोलिसांना चकवा देत फिरत होते. पोलिसांनी अक्षरश: सिनेस्टाइल पाठलाग करून त्यांना जेरबंद केले.

तुषार बाळासाहेब ढिकले, दंगल ऊर्फ उमेश अशोक पाटील असे सोनसाखळी चोरांची नावे आहेत. मैत्रिणींना फिरायला नेण्यासाठी तसेच रोलेट खेळण्यासाठी चेन स्नॅचिंग करत असल्याचा धक्कादायक खुलासा इंजिनिअर असलेल्या दोघा चोरांनी केला आहे. इंजिनिअर असूनही झटपट पैसे कमावण्यासाठी त्यांनी हा प्रकार सुरु केला असल्याने समजते. तीन वर्षात तब्बल 56 सोनसाखळी चोरी केल्या असून संशयितांच्या बँक खात्यात 20 लाख रुपयांची रक्कम, 48 लाखांचा फ्लॅट आणि कार घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

तीन वर्षांत या आरोपींकडून अनेक गुन्हे उघड झाले आहेत. अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. यापैकी आडगाव – 2, म्हसरूळ – 3, पंचवटी – 4, सरकारवाडा – 4, मुंबई नाका – 9, भद्रकाली- 4, गंगापूर – 6, अंबड – 7, इंदिरानगर – 10, उपनगर – 7 पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत.


शेअर करा