पैसे घेण्यासाठी बोलावून मुकादमाने केली डांबून मारहाण , बायको घेतेय पतीचा शोध

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी परिसरात समोर आलेली असून मजुरीच्या कामाचे पैसे देतो म्हणून घरी बोलावून हात-पाय बांधून दोन तरुणांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे त्यानंतर आरोपींनी त्यांचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि या प्रकरणाला वाचा फुटली.

15 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास माढा तालुक्यातील भुताष्टे येथे ही घटना घडली असून सोनाली विकास नाईकवाडे ( राहणार भुताष्टे तालुका माढा ) यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली असून मुकादम इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार सोनाली यांचे पती विकास नाईकवाडे आणि सेवक कसबे हे दोन जण मुकादम म्हणून काम करत असलेला बालाजी मोरे यांच्याकडे दोन महिन्यांपासून काम करत होते. फिर्यादी यांच्या भावाचे 15 ऑगस्ट रोजी लग्न असल्याने लग्न झाल्यानंतर तीन वाजता बालाजी मोरे यांनी फिर्यादी महिलेच्या पतीला आणि सेवक कसबे या दोघांना कामाचे पैसे घेण्यासाठी बोलावले होते.

रात्र झाली तरीदेखील फिर्यादी यांचे पती घरी आले नाहीत म्हणून कदाचित लग्नातील एखाद्या पाहुण्याकडे ते थांबलेले असतील असे फिर्यादी नाव वाटले आणि 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता फिर्यादी यांचा भाऊ घरी आला त्यावेळी दाजी विकास आणि गावातील सेवक कसबे यांना बालाजी मोरे, भालचंद्र अनंत यादव आणि इतर दोन व्यक्तींनी हातपाय बांधून दोरीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादी महिलेने आपल्या पतीचा शोध घेतला तरीदेखील ते आढळून आले नाहीत त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेत न्यायालयात दाखल केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. वृत्त लिहीपर्यंत संबंधित व्यक्ती आढळून आलेले नाहीत.


शेअर करा