पोलिसांनी पुण्यात ‘ त्या ‘ दोघी धरल्या , सीसीटीव्हीमध्ये कारनामा झाला कैद

शेअर करा

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सोन्याची दुकाने ही चोरट्यांच्या चांगलीच निशाण्यावर आहेत अशाच एका प्रकारात पुणे येथे वडगाव मावळ परिसरात सोने खरेदीच्या बहाण्याने दोन महिला आल्या होत्या. त्यांना सीसीटीव्ही फुटेज वरून दीड ग्रॅम सोने चोरताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांची रवानगी थेट पोलिसात करण्यात आली आहे .

वडगाव मावळ येथील बाजारपेठेतील एका ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला असून दुकानाचे मालक अभय कन्हैयालाल बाफना ( वय 55 राहणार वडगाव ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. वर्षा धीरूभाई परमार ( वय 40 ) व सुरेखा मनोज चव्हाण ( वय 48 दोन्ही राहणार सरोदे कॉलनी मुंढवा पुणे ) असे चोरी करणाऱ्या महिलांचे नाव आहे.

वडगाव मावळ येथील बाफना ज्वेलर्स येथे या दोघी सोन्याच्या रिंग खरेदी करण्याच्या बहाण्याने गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने दुकान मालक अभय आणि रेखा बाफना यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले त्यावेळी त्यांनी सोन्याच्या दोन रिंग चोरल्याचे दिसून आले. त्यापैकी एक रिंग त्यांनी दुकानात टाकली तर दीड ग्रॅम सोन्याची रिंग चोरून घेऊन जाताना त्यांना पकडण्यात आले. या महिलांनी अशाच पद्धतीने इतरत्र देखील चोऱ्या केल्याची शंका असून पोलीस उपनिरीक्षक शीला खोत प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा