पोलीस दारूच्या नशेत असल्याने मनोरुग्ण व्यक्तीने केली झाडूने धुलाई : पहा व्हिडीओ

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या चंद्रपूर इथे समोर आलेले असून एका आरोपीने चक्क पोलिसाला मारहाण केलेली आहे . मारहाण करणारा आरोपी हा मनोरुग्न असून या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून एक मानसिक रुग्ण असून त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते त्यामुळे 16 मे रोजी त्याला रुग्णालयात नेण्यात आलेले होते. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी एक पोलीस कर्मचारी त्याला घेऊन गेला मात्र पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याकारणाने मनोरुग्ण असलेल्या या व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.

दारूच्या नशेत असलेला पोलीस कर्मचारी पाहिल्यानंतर मनोरुग्ण असलेल्या या व्यक्तीचे मानसिक संतुलन आणखीन बिघडले आणि त्याने हॉस्पिटलमध्ये पडलेला झाडू घेऊन डॉक्टर नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोरच या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली . रुग्णालयातील काही कर्मचारी पोलिसाचे रक्षण करताना दिसत आहेत मात्र या घटनेनंतर पोलिसांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे.


शेअर करा