पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्येच महिलेची ‘ टोकाची भूमिका ‘ , महिला ऍडमिट

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात उघडकीला आलेली असून नेवासा येथील पोलिस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये घुसत भेंडा येथील एका महिलेने विषारी औषधाची बाटली तोंडाला लावून पिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून विशेष म्हणजे सासरचे मंडळींनी आपला छळ करत आहेत म्हणून ही महिला तिथे पोहोचली होती.

उपलब्ध माहितीनुसार, आरती विकास ढवळे ( वय 30 ) असे या महिलेचे नाव असून खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तिच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक केबिनमध्येच तिने आपल्यासोबत आणलेली लपून आणलेली विषाची बाटली अचानकपणे काढली आणि त्यानंतर विष पिण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि तिच्या हातातून ही बाटली हिसकावून घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केले.

आरतीचे सासरचे गाव बीड जिल्ह्यातील असून सध्या ती माहेरी राहते. तिने सासरच्या लोकांवर छळाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच संदर्भात कुकाना पोलिसांनी तिला नेवासा पोलीस निरीक्षक यांच्यासमोर हजर केले होते त्यावेळी तिने अचानकपणे लपून आणलेली बाटली काढली आणि त्यातील विष पिण्याचा प्रयत्न केला. कुकाना दूरक्षेत्रचे हवालदार बाळासाहेब कोळपे यांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून सदर प्रकरणी तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा