पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी तरुणांना मुंग्यांचे चावे तर महिलांना चक्क..

शेअर करा

प्रत्येक देशाची एक वेगळी काहीतरी संस्कृती असते आणि नागरिकांना त्याचा अभिमान देखील असतो मात्र काही प्रथा इतक्या विचित्र असतात की त्या ऐकून विश्वासच बसत नाही. आफ्रिकेतील देशात अशीच एक प्रथा सुरू असून शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या प्रथांचा नागरिकांच्या मनावर इतका पगडा आहे की कितीही शिक्षण झाले तरी ते या प्रथांचे पालन करण्यात कचरत नाहीत.

काही जमातींमध्ये स्वतःचे पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी मुंग्यांचे चावे सहन करावे लागतात तर काही जमातीत कुटुंबातील पुरुष सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील स्त्रीला धारदार शस्त्राने स्वतःचा अंगठा कापावा लागतो.

आफ्रिकेतील ह्या हॅमर नावाच्या आदिवासी जमातीमध्ये अशीच एक वेगळी प्रथा असून अजून तिथे विवाह विवाहयोग्य तरुणी झाली ही चक्क तिला चांगला वर निवडण्यासाठी आधी चाबकाचे फटके पाठीवर सहन करावे लागतात. जी तरुणी जास्तीत जास्त फटके सहन करेल तिला तिच्या पसंतीचा वर निवडण्याची संधी दिली जाते या प्रथेला ऊकुली तुला असे म्हटले जाते

तरुणांना देखील आपण लग्नासाठी योग्य आहोत याचा पुरावा म्हणून एक बुल जम्पिंग फेस्टिवल असतो त्यामध्ये विवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना समोर उभ्या करण्यात येणाऱ्या दहा ते बैलांच्या 15 बैलांच्या पाठीवरून उड्या मारत पलीकडच्या टोकाला पोहोचावे लागते. यामध्ये अनेक तरुण पडून जखमी होतात तसेच बैलांच्या पायाखाली देखील तुडवले जातात. याच जमातींमध्ये लग्न झाल्यानंतर स्त्रीला पतीकडून मार सहन करावा लागतो. पुरुषाला वाटेल त्यावेळी तो तिच्यावर आपला अधिकार गाजवत तिला मारहाण करतो आणि याचे महिलांना देखील काही विशेष वाटत नाही.


शेअर करा