प्रियकराला पती मारत असल्याचे पाहून पोलीस पत्नीने ‘ असे काही ‘ केले की

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका पोलीस पत्नीने चक्क प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीला तिच्याच पोलीस ठाण्याच्या हददीत मारहाण केली. वर्धा जिल्ह्यात केळझर इथे ही घटना उघडकीस आली असून पतीने याबाबतची तक्रार सेलू पोलिसात दिली असता पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, केळझर येथील ट्रॅव्हल्सवर वाहक म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीचा पत्नीशी प्रेमविवाह झालेला असून ती कारंजा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून नोकरीवर असून विवाहानंतर तिचे ठाण्यातील एका नाईक पोलीस शिपायासोबत सूत जुळले. पतीने तिला सतत समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा वागण्यात काही बदल झाला नाही .

बुधवारी पत्नी ही पतीच्या घरी येऊन कपडे भरू लागली तेव्हा तिचा प्रियकर घरात आला असताना पतीने त्याला हटकले आणि त्यांच्यात वादावादी सुरु झाली. पती आपल्या प्रियकराला मारहाण करत असल्याचे पाहून संतप्त पत्नीने पतीच्या कानाखाली वाजवली. पतीच्या म्हणण्याप्रमाणे पत्नी आणि तिचा प्रियकर हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते . सेलू पोलिसात पतीने दिली असता पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे .


शेअर करा