
देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना छत्तीसगड इथे उघडकीस आली असून सदर घटनेत आरोपीने आधी विवाहित असलेल्या प्रेयसीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलीचे देखील अपहरण केले. लग्नापूर्वीपासूनच सदर तरुणीसोबत आरोपीचे प्रेमप्रकरण सुरु होते आणि सदर प्रकरण हे तिचे लग्न झाल्यावर देखील सुरु होते त्यातूनच दोघांनी मिळून घरातून पळून जाण्याचा निर्णय़ घेतला आणि दोघेही फरार झाले.
उपलब्ध माहितीनुसार , सूरज वर्मा असे आरोपीचे नाव असून विवाहितेला एक मुलगी होती. लग्न झाल्यावर दोघे पुन्हा एकमेकांकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. सदर महिलेने आपली मुलगी ही पतीकडे सोडून घरातून प्रियकरासोबत पलायन केले मात्र दरम्यानच्या काळात तिला तिच्या मुलीची आठवण येऊ लागली आणि ती वारंवार आपल्या प्रियकराकडे मुलीला काहीही करून मुलीला माझ्याकडे घेऊन ये असा तगादा लावू लागली त्यातूनच पुढे या मुलीचे अपहरण करण्याचा प्लॅन करण्यात आला.
आरोपी सुरज याने मुलीचं अपहरण करण्याचा कट रचला आणि आपल्या दोन मित्रांना सोबत घेतलं. तिघांनी मिळून मुलीच्या घराच्या परिसराची रेकी केली आणि मुलीच्या अपहरणाची योजना आखली. एक दिवस संधी साधून मुलीला बाईकवर बसवून ते तिच्या आईकडे घेऊन आले. आरोपींमध्ये एक जण अल्पवयीन असल्याचे देखील समोर आले आहे .
आपली मुलगी संध्याकाळपर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांच्या कुटुंबीयांनी अगोदर आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला आणि नंतर पोलिसांत तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. प्राथमिक संशय म्हणून पळून गेलेली पत्नी आणि तिच्या प्रियकरावर त्यांनी संशय व्यक्त केला. पोलिसांनी दोघांचा शोध घेत त्यांना हुडकून काढले असताना अपहृत मुलगी ही त्यांच्याच ताब्यात असल्याचे समोर आले. मुलीला पुन्हा तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं असून तिची आई आणि प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.