प्रेमविवाहाचा ‘ असा ‘ दुर्दैवी शेवट कधीच ऐकलेला नसणार

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना जळगाव इथे समोर आली असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा मोबाईल चार्जिंग करण्याच्या वायरने गळा आवळून खून केलेला आहे. शनिवारी संध्याकाळी निमखेडी शिवारात हा प्रकार घडलेला असून मयत पत्नी आपल्या पतीसोबत शिवधाम मंदिर रस्त्यावर असलेल्या खूबचंद साहित्य टावर येथे राहत होती.

उपलब्ध माहितीनुसार, सविता जितेंद्र पाटील ( वय 20 ) असे मयत पत्नीचे नाव असून जितेंद्र संजय पाटील ( वय 25 राहणार बांबोरी तालुका धरणगाव ) असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती हा स्वतःहून पोलिसात दाखल झालेला होता.

सदर दांपत्य हे अवघ्या आठ दिवसांपूर्वीच या फ्लॅटमध्ये राहण्यास आले होते. त्यांनी प्रेमविवाह केला असून त्यांना दीड वर्षांची मुलगी देखील आहे. नवीनच फ्लॅट घेतलेला असल्याने त्यांनी या मुलीला आपल्या सोबत आणलेले नव्हते अन जितेंद्रच्या आई-वडिलांकडे ठेवलेले होते. मात्र त्यांच्यात भांडण झाल्यानंतर संतापाच्या भरात जितेंद्र याने त्याच्या पत्नीचा खून केला आणि त्यानंतर त्याला पश्चाताप झाला म्हणून तो पोलिसात आला असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


शेअर करा