फारकत का घेते ? म्हणत पत्नीला बाजारात गाठले अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली असून ‘ तू माझ्या सोबत राहण्यास विरोध का करते फारकत का घेते ‘ असा प्रश्न विचारत एका पतीने चक्क पत्नीच्या डोक्याला चाकू लावून तिला मारहाण केली आहे. जुने नाशिक परिसरात ही घटना घडलेली असून पीडित विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पती संदीप मगरे ( राहणार गोवंडी मुंबई ) याने गुरुवारी सात तारखेला रात्री दहाच्या सुमारास घास बाजार परिसरात येऊन त्याच्या पत्नीसोबत वाद घातला त्यावेळी त्याने पत्नीला माझ्यासोबत फारकत घेऊ नकोस असे म्हणत तिला शिवीगाळ आणि दमदाटी केली तसेच चाकूने पत्नीच्या गळ्याला दुखापत केली. सदर प्रकरणी भद्रकाली पोलिसांकडून गुन्हा दाखल केला गेलेला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा