फेसबुकवरची ‘ तसली ‘ मैत्री बीडच्या लॉजवर जाऊन संपली, पीडिता म्हणतेय की…

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे बीड शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत ही घटना उघडकीस आली असून यातील पीडित महिलेने आरोपीने आपल्यावर मैत्रीचा गैरफायदा घेत वेळोवेळी अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

उपलब्ध माहितीनुसार, सदर महिलेची फेसबुकवर आरोपीशी मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. आरोपीने याचा फायदा घेत विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला त्यानंतर काही काळ तो फिर्यादी महिलेच्या संपर्कात राहिला, मात्र त्यानंतर त्याने त्याचा फोन बंद केला आणि तिची भेट घेणे टाळले. आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याने शुक्रवारी महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीच्या विरोधात तक्रार दिली.

उपलब्ध वृत्तानुसार 35 वर्षीय महिला ही विधवा असून ती बीडमध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत आपल्या दहा वर्षीय मुलासोबत राहते. सुमारे वर्षभरापूर्वी तिची सम्राट गित्ते ( राहणार परळी ) याच्याशी ओळख झाली होती. काही दिवसांनी त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले आणि आणि केवळ फेसबुकवरच नव्हे तर ते फोनवरही एकमेकांशी बोलू लागले त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली.

मागील सहा महिन्यात सम्राट याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. बीड परळी मार्गावरील एका लॉजमध्ये नेऊन त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. आरोपी हा आपला निव्वळ शारीरिक संबंधासाठीच वापर करत आहे आणि लग्नाबाबत विचारले असता सातत्याने टाळाटाळ करत असल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आले आणि तिने आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत घेतली.


शेअर करा