
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना नागपूर येथे उघडकीस आली होती. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बामणी येथील कपडे काढून केलेला डान्स प्रकरणाला प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला असून कुही आणि मौदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कुही तालुक्यातील सील्ली आणि भुगाव या ठिकाणी झालेल्या डान्स हंगामा कार्यक्रमात अश्लीलतेचा कळस झालेला पाहायला मिळाला होता.
सदर प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा झाल्यानंतर आणि सोशल मीडियामधून या प्रकाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी उमरेड तालुक्यातील बामणी येथील डान्स हंगामा प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना जेरबंद केले आहे. सोमवारी उमरेड न्यायालयात या आरोपींना हजर करण्यात आले. त्यात अलेक्स उर्फ प्रबुद्ध गौरीशंकर बागडे याच्यासह कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर उर्फ लाला मांढरे, सुरज नागपुरे, अनिल दमके या चौघांना न्यायालयाने 26 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे तर अन्य सात आरोपींची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
कुही तालुक्यातील सील्ली येथे 16 आणि 17 जानेवारी रोजी दोन दिवस विनापरवाना गावातील लोकांची गर्दी जमून डान्स हंगामा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिल्ली येथे 17 जानेवारीला भंडारा येथील डान्स ग्रुपचे सादरीकरण होते त्यानंतर या डान्स ग्रुपमध्ये बंद शामियान्याच्या आत डान्स सुरू असताना अश्लीलतेचा कळस झालेला पाहायला मिळाला होता. धक्कादायक बाब म्हणजे काही शौकीन लोकांनी या प्रकाराचे चित्रीकरण केले आणि आणि सदर घटनेची चर्चा होऊ लागली त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 11 आरोपींना अटक केली आहे.