बहीण भावाने मंदिरात लग्न करून व्हिडीओ केला व्हायरल, तरुणी चार महिन्याची गर्भवती

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बिहार इथे उघडकीस आली आहे. चक्क नात्याने सख्खे चुलत बहीण भाऊ एकमेकांच्या प्रेमात इतके पागल झाले ही दोघांनी लग्न देखील केले . तब्बल तीन वर्षांपासून त्यांचे हे प्रेमप्रकरण सुरु होते. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात हा प्रकार समोर आला असून तरुणी आता ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार , चुलत भाऊ-बहिणीने गावातील एका मंदिरात लग्न केलं अन त्याचा एक व्हिडीओ देखील त्यांनी व्हायरल केला. भगवानपूर प्रखंड येथील एका गावामध्ये घडलेली ही घटना असून व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी गावातील मंदिरात लग्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाआधीच ही तरुणी 4 महिन्यांची गर्भवती आहे.

लग्न केलेल्या या भाऊ-बहिणीमध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं मात्र घरातून अशा नात्याला परवानगी मिळणार नाही याचा त्यांना अंदाज होता त्यामुळे त्यांनी बंड करत चक्क मंदिरातच लग्न केले. दोघांची घरंही जवळपास आहेत आणि नात्यात दोघेही चुलत भाऊ-बहीण आहेत. त्यांच्या या असल्या प्रकारानंतर दोन्ही कुटुंबामध्ये मात्र तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे .

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात सिंदूर घेऊन बहिणीच्या भांगेत भरताना दिसत आहे. यानंतर खिशातून मंगळसूत्र काढतो आणि मुलीच्या गळ्यात घालतो. तरुणाने सदर घटनेचा व्हिडीओ देखील केला असून तो स्वत:च व्हायरल केला आहे. गावकऱ्यांना कळताच त्यांच्या घऱाबाहेर गर्दी जमा झाली. आपल्या चुलत बहिणीसोबत लग्न केल्यामुळे गावात मोठी चर्चा सुरू झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


शेअर करा