
विवाहबाह्य संबंधातील एक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून कर्नाटक उच्च न्यायालयाने कुणाच्या संमतीशिवाय कॉल डिटेल्स मागणे हे घटनाबाह्य ठरवलेले आहे. सदर प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बंगळुरू येथे हा प्रकार समोर आला होता.
एका कुटुंबाच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा आरोप केला होता त्यासाठी त्याने न्यायालयाकडे पत्नीने प्रियकराला केलेले फोन तिचे कॉल डिटेल्स तपासण्याची विनंती न्यायालयाला केली होती त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने मोबाईल कंपनीला कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन देण्याचे देण्याची मागणी केली होती मात्र पत्नीने या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते.
महिलेच्या म्हणण्याप्रमाणे तिच्यावर अवैध संबंध असल्याचा केवळ आरोप करून तिला नाहक फसवले जात आहे तर पतीच्या म्हणण्याप्रमाणे तिचे मोबाईल लोकेशन आणि तिचे कॉल डिटेल्स काढल्यानंतर तिचा प्रियकर हा आपल्या घरी येत होता तसेच ती त्याच्या संपर्कात होती हे न्यायालयासमोर येईल असे म्हणणे होते मात्र न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून न घेता सदर प्रकार हा महिलेच्या गोपनीयतेचे उल्लंघन ठरेल असे सांगत हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले आहे.