बायको रुसून माहेरी गेली , पतीने व्हिडीओ कॉल केला मात्र..

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून रुसून माहेरी गेलेल्या पत्नीने सणाच्या दिवशी देखील आपल्या तान्ह्या मुलीचा चेहरा व्हिडिओ कॉल वर आपल्याला दाखवला नाही म्हणून व्यथित होऊन एका पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बदलापूर येथे समोर आलेले आहे.

वडवली परिसरातील तलरेजा कॉलेजच्या बाजूला शंकर राजू जाधव हा तरुण पत्नी दोन महिन्याची मुलगी आणि आई-वडिलांसह राहत होता मात्र पत्नी हिला वेगळे राहायचे असल्याकारणाने त्यांच्यात भांडणे देखील होत होती आणि याच कारणातून पत्नी अखेर माहेरी निघून गेली. शुक्रवारी धुळवड असल्याने पत्नी मुलीला घेऊन घरी येईल अशी त्याला आशा होती मात्र ती आली नाही त्यानंतर शंकर याने तिला फोन केला असता तिने व्हिडिओ कॉलवर शंकरला मुलीचे तोंड देखील दाखवले नाही त्यामुळे शंकर हा दुःखी झाला आणि त्याने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नीने तो व्यथित असल्याची ही बाब शेजारी राहणार्‍यांना कळवल्यानंतर शंकरच्या घरच्यांनी बेडरूममध्ये धाव घेतली त्यावेळी शंकर मृतावस्थेत आढळून आला असून किरकोळ गोष्टीवरून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .


शेअर करा