बाळा हे तुझे वडील , जाणून घ्या ‘ ह्या ‘ फोटोमागची जगावेगळी कहाणी

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एक जगावेगळी अशी कहाणी समोर आलेली असून बिहारच्या मोतीहारी येथील हे प्रकरण आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी नवरा बायकोचा वाद झाला त्यानंतर ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. पत्नी बेतीया येथील तिच्या आई-वडिलांच्या घरी राहायला आली आणि पुढील शिक्षण तिने सुरू केले तर पत्नी कायमची माहेरी निघून गेल्यानंतर पती कोलमडला आणि त्याने एयरफोर्स मधील सरकारी नोकरी सोडून दिली आणि साधू बनत तो भटकला आणि अखेर पूजापाठ करू लागला.

लग्नानंतर काही दिवसातच या पत्नीला दिवस गेलेले होते आणि तिने एका मुलाला देखील जन्म दिलेला होता मात्र पुढील काळात तिला सातत्याने आपल्या पतीची आठवण येत होती मात्र त्यांच्यात कुठलाही संपर्क नव्हता त्यामुळे तिने देखील दुसरे लग्न केले नाही आणि तिचा पती हा देखील साधू बनला मात्र त्याने देखील कुणाशीही लग्न केले नाही . दरम्यानच्या काळात त्यांचा मुलगा मोठा झाला आणि त्याने आईला वडिलांबद्दल विचारण्यास सुरुवात केली अखेर या महिलेने आपल्या पतीचा शोध घेण्याचे ठरवले आणि पंधरा वर्षानंतर एकत्र भेटल्यानंतर त्यांनी संसार सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

प्रभाकर पांडेय असे असे या पतीचे नाव असून ते गोविंदगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीतवारपुर येथील रहिवासी आहे. त्यांचा विवाह पेपरकोठे येथील संदीपदेवी नावाच्या एका तरुणी सोबत झालेला होता. लग्नानंतर ते दोन वर्षे सोबत राहिले आणि त्यांना एक मुलगा देखील झाला मात्र त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली आणि त्यांच्यातील वाद वाढतच गेले त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

कोर्टाने देखील मध्यस्थी करत त्यांचा विवाह जुळवण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटी पत्नीने सोबत राहण्यास नकार दिल्याने अखेर पत्नी माहेरी निघून गेली आणि पत्नी माहेरी गेल्यानंतर प्रभाकर कोलमडून पडले . त्यांनी त्यानंतर एअरफोर्सच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सुखाच्या शोधासाठी साधू बनण्याचा निर्णय घेतला . एकेकाळी अंगावर असलेला एअर फोर्सचा युनिफॉर्म काढून त्यांनी साधूचा वेश धारण केला आणि जंगलात रानावनात ते भटकू लागले. अनेक मंदिरात त्यांनी ध्यानधारणा केली पूजापाठ केला आणि त्यानंतर एक परिपूर्ण साधू ते बनलेले होते.

तब्बल 15 वर्ष साधू बनून राहिल्यानंतर त्यांचे बोलणे वागणे सर्व काही बदलून गेलेले होते दुसरीकडे त्यांचा मुलगा मोठा होत होता आणि तो आईला सातत्याने वडिलांबद्दल विचारत असायचा अखेर त्याच्या आईने तिच्या पतीचा शोध घेण्याचे ठरवले आणि तपासाला सुरुवात केली आणि अखेर तपासाचे धागेदोरे या प्रभाकर यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. दोघेही पती-पत्नी पंधरा वर्षांनी भेटले आणि अखेर त्यांनी पुन्हा संसार सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे . आपल्या मुलाला वडिलांची माया मिळावा मिळावी या हेतूने आपण पुन्हा एकदा संसार सुरू करत असल्याचे प्रभाकर यांनी सांगितलेले आहे .


शेअर करा