
कर्नाटक येथील हिजाब प्रकरणाला समर्थन करणारे पोस्टर बीड शहरात लावण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका निर्माण होऊ नये म्हणून हे पोस्टर तात्काळ हटविण्याचे निर्देश पोलिसांनी संबंधित यांना दिले आणि त्यानंतर अवघ्या काही तासाच्या आत हे पोस्टर हटवण्यात आले.
कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तसेच सामाजिक सलोखा अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी विद्यार्थी नेत्यास सीआरपीसी 149 नुसार नोटीसही बजावली आहे. संबंधित यांना समज दिली असल्याचे पोलिस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितलेले आहे. हिजाब संदर्भात समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो, संदेश व्हायरल करू नये आणि शांतता राखावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी केले आहे.