भांडणात सासू मध्ये पडली म्हणून चक्क सासूवरही.., पुण्यातील प्रकार

शेअर करा

पुणे शहरात आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पिंपरी येथे उघडकीला आली असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसोबत सासूवर देखील सत्तूरने वार केले. प्रकरणी एक जनाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रूपाली सुभाष गायकवाड आणि मंगल दळवी अशी जखमी झालेल्यांची नावे असून सुभाष नामदेव गायकवाड ( वय 40 राहणार न्हावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे ) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. दीपमाला लक्ष्मण पुरकर ( वय 39 ) असे तक्रारदार महिलेचे नाव असून त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची बहीण रूपाली यांचा आणि सुभाष गायकवाड यांचा विवाह झाला होता मात्र त्यानंतर वारंवार सुभाष हा पत्नी यांना चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत असायचा त्यातून त्याने रूपाली आणि त्यांची आई यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात सत्तूर नामक हत्याराने वार केले त्यावेळी आईमध्ये पडली असता आरोपीने त्यांना देखील जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात आणि हातावर वार केले

जखमी झालेल्या रुपाली आणि त्यांची आई मंगल दळवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून रूपाली यांची बहिण असलेल्या फिर्यादी यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सुभाष गायकवाड याला ताब्यात घेतले.


शेअर करा