
पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून तू सारखे मला फोन का करतो असा जाब विचारल्यानंतर एका महिलेवर धारदार शस्त्राने वार केल्याचा प्रकार सोमवारी दहा तारखेला समोर आलेला आहे. भोसरी येथील ही घटना असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, माया बिराडे ( वय 38 राहणार गवळी नगर भोसरी ) असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव असून विनायक सर्जेराव कांबळे ( राहणार जाधव वाडी चिखली ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. जखमी महिला आणि आरोपी विनायक यांचे वैयक्तिक वाद होते त्यावरून माया यांनी आरोपीला सारखे मला फोन का करतो असाच जबाब जाब विचारला त्यावर आरोपी विनायक याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
सदर प्रकार हा दहा तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल भोसरी जवळील एका लेनमध्ये घडलेला असून माया या गंभीर जखमी झालेल्या आहेत तर असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.