‘ मज्जा आली असेच व्हिडीओ पुन्हा बनवा ‘ , नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहून ..

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ह्याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वधू-वर एकमेकांना गळ्यात हार घालण्याच्या वेळी मिठाई खाऊ घालत आहे मात्र अचानकपणे त्यांच्या जोरदार भांडण होते त्याचा हा व्हिडिओ आहे.

सदर व्हिडिओ मध्ये दोन्ही जोडप्यांनी लग्नाला कुस्तीचा आखाडा बनवलेला असून नवऱ्याने लग्नात मिठाई खाल्ली नाही म्हणून वधूला राग येतो आणि त्यांच्यात दुसर्‍याच क्षणी मारामारी सुरू होते. नवविवाहीत जोडपे एकमेकांना या व्हिडिओमध्ये कानशिलात लावताना दिसत असून त्यांचा हा व्हिडिओ पाहून त्यांचा संसार पुढे कसा होईल याबद्दल नागरिक प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल झालेल्या वधूला सर्वप्रथम वर मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर वधू मिठाई खाण्यास नकार देते मात्र वर तिला खा म्हणतो. मिठाई खात नाही मग तिच्यावर ओरडून तो म्हणतो ‘ अरे खा ‘ त्यानंतर वधूला तो मिठाई खाऊ घालतो मात्र त्याच्यावर वेळ आल्यानंतर व जेव्हा ती त्याला मिठाई खाऊ घालते त्यावेळी तो खात नाही त्यानंतर ती त्याला जबरदस्तीने मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र तो तिच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर ती देखील त्याची जोरदार धुलाई करते अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे .

त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या भावी संसाराबद्दल नागरिक त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत तसेच काही नागरीक अशा स्वरूपाचे व्हिडिओ यापुढे देखील बनवत जा असा देखील खोचक सल्ला देत आहेत.


शेअर करा