महाराष्ट्र हादरला..चक्क शिवसेनेच्या आमदाराला महिलेचा ‘ तसा ‘ कॉल आला , आरोपी जाळ्यात

शेअर करा

महाराष्टात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून मोठी खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला राजस्थान येथून अटक करण्यात आलेली आहे .मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आतापर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत असलेले असले प्रकार चक्क आमदारासोबत होत असल्याने गुन्हेगारांना कोणाचे नक्की अभय आहे ? याची चर्चा सुरु झाली आहे .

तक्रारदार शिवसेना आमदार हे मुंबईतून सलग दोन वेळा विधानसभा आमदार आहेत. त्यांना 20 ऑक्टोबरच्या रात्री मोबाईलवर एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. सुरुवातीला चॅटद्वारे या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली म्हणून आमदाराने मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदाराला एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला आणि त्यानंतर महिलेने सुमारे 15 सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली.

आमदारांचे सदर महिलेशी बोलणे झाले आणि काही वेळातच आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करत त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. असला काही प्रकार आपल्यासोबत होईल याची आमदार यांना कल्पनाच नव्हती, केवळ मदतीसाठी म्हणून व्हिडीओ कॉल उचलला म्हणून असा धक्कादायक प्रकार आपल्यासोबत झाल्याने त्यांनी मुंबईत पोलिसांत तक्रार दिली आणि सूत्रे हलली. भरतपूर येथील सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून पकडले असून आता आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.


शेअर करा