
पोलिसात महिलांची भरती झाल्यानंतर तरी भ्रष्टाचार कमी होईल याची अपेक्षा फोल ठरताना दिसत असून असाच एक प्रकार नवी मुंबईतील उरण पोलिस ठाण्यात समोर आलेला आहे . उरण पोलिस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सिंधू तुकाराम मुंढे यांना ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतलेले आहे. उरण पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार सदर महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून उरण पोलिस ठाण्यात काम करतात . पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडून सदर महिला अधिकाऱ्याने साठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्या संदर्भात आरोपीच्या नातेवाईकांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक अश्विनी पाटील यांनी कारवाई करत मुंडे यांना 50 हजार रुपयांची रोख रक्कम तक्रारदार व्यक्ती यांच्याकडून स्वीकारताना 14 जून 2023 रोजी ताब्यात घेतलेले आहे.