महेश मांजरेकर यांच्यावर कारवाईसाठी बँजो कलाकार आक्रमक

शेअर करा

मराठी चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका बँड पथकातील कलाकाराला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत जामखेड तालुक्यातील खर्डा येथे बँजो कलाकारांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केलेला आहे. खर्डा पोलिसांना त्यांनी या प्रकरणी निवेदन दिलेले असून त्यामध्ये महेश मांजरेकर यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे.

महेश मांजरेकर यांनी एका वेब सिरीजच्या चित्रीकरणाच्या दरम्यान बँड पथकातील एका कलाकाराला अपमानास्पद वागणूक दिली असे आंदोलकांचे म्हणणे असून त्यांच्या या वक्तव्यामुळे कृतीमुळे अनुसूचित जाती समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या या कृतीचा निषेध करत आहोत असे बँजो पथकाचे युवा नेते काशिनाथ सदाफुले यांनी सांगितलेले असून पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासोबत सचिन पगारे, जितू पगारे, किरण जाधव मच्छिंद्र जाधव, नाना गायकवाड यांच्यासह बॅन्जो पथकात काम करणारे अनेक तरुण सहभागी झालेले होते.


शेअर करा