माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत तरुणीला चक्क चावला , पुण्यातील प्रकार

शेअर करा

गेले काही वर्षांपासून पुणे शहरात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले असून माझे तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न कर असे म्हणत चाकूचा धाक दाखवत एका तरूणीचा बळजबरीने चावा घेऊन तिला हाताने मारहाण करत गंभीर जखमी करणाऱ्या सराईत आरोपीच्या विरोधात पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केलेला आहे. निहाल विशाल भाट ( वय तेवीस राहणार भोसले वस्ती कंजारभाट येरवडा ) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर विनयभंगाचा इतर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ही शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या घरी जात असताना निहाल हातात चाकू घेऊन तू बाहेर ये माझ्यासोबत चल नाहीतर मी दरवाजा तोडून घरात घुसेल आणि मला जर कुणी अडवले तर त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करत होता. त्याला समजवण्यासाठी म्हणून पीडित तरुणी बाहेर आल्यावर त्याने बळजबरीने तिला चाकूचा धाक बसून दाखवत मोटरसायकलीवर बसून स्वतःच्या घरी नेले.

तिथे गेल्यावर माझ्यासोबत लग्न कर म्हणून तोंडावर आणि हातावर मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याने पीडित मुलीच्या दंडावर पाठीवर गालावर दाताने चावा घेतला आणि चाकूने तिच्या उजव्या पायाच्या नडगीवर आणि गुडघ्यावर वार करत तिला गंभीर जखमी केले. पीडित तरुणीने कशीबशी करत सुटका करून घेतली आणि तिथून फरार झाली.

शनिवारी रात्री उपचार खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतल्यावर रविवारी तिने येरवडा पोलीस स्टेशन गाठत निहाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली मात्र तो फरार झाला होता. सोमवारी सकाळी तो घरी आल्याची माहिती समजतात पोलिस शिपाई श्रीनाथ कांबळे आणि अजित वाघुले यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले.


शेअर करा