
‘ माझ्याशी बोल नाहीतर तुझ्या वडिलांना मारहाण करून मी स्वतः देखील आत्महत्या करेल ‘ अशी धमकी देत एका आरोपीने एकतर्फी प्रेमातून युवतीला शिवीगाळ करत तिचा पाठलाग केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे घडलेली आहे. सदर प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात एकोणीस तारखेला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, पीडित 19 वर्षे युवती ही रस्त्याने जात असताना आरोपी सुमित सुनील माळवे ( राहणार चंद्रपूर ) याने तिचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवले आणि आणि माझ्याशी बोल नाहीतर तुझ्या आई वडिलांना मारहाण करून मी स्वतः देखील आत्महत्या करेल, अशी धमकी दिली आणि तिच्यासोबत असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केला.
आपल्या सोबत झालेल्या या प्रकारानंतर पीडित घाबरून गेली आणि तिने या प्रकाराची माहिती घरी सांगितली. त्यानंतर सदर युवतीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सावंगी पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.