‘ माझ्या बहिणीसोबत तुझे लफडे आहे ‘ म्हणत मिरवणुकीतून ओढले अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी जिल्ह्यात समोर आलेली असून ‘ माझ्या बहिणीसोबत तुझे लफडे आहे ‘ असे म्हणत एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्यात आलेले आहे. पाथरी तालुक्यातील बांदरवाडा येथे 28 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली असून तीन जणांच्या विरोधात पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आंबेडकर जयंतीनिमित्त दुपारी चारच्या सुमारास गावात मिरवणूक निघाली होती यावेळी करण प्रभाकर भिसे ( वय 23 ) अमोल खिल्लारे याच्यासोबत मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणूक संपल्यानंतर अशोक मारुती राक्षे, रवी मारुती राक्षे ( राहणार बांदरवाडा) आणि अविनाश सर्जेराव गणकवार ( तालुका घनसांगवी जिल्हा जालना ) यांनी करण भिसे याला तुझ्यासोबत जरा बोलायचे आहे असे सांगत बाजूला घेतले आणि तू माझ्या बहिणीशी बोलतोस तिचे आणि तुझे लफडे आहे असे सांगून करण याच्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि त्यानंतर ते पळून गेले.

जखमी अवस्थेत असलेला करण याला पाथरी आणि त्यानंतर परभणी येथील येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. करण भिसे यांचे वडील प्रभाकर कोंडीबा भिसे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून वरील तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस उपनिरीक्षक कराड पुढील तपास करत आहेत .


शेअर करा