
महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीला आली असून मला फ्लॅट भाड्याने घ्यायचा आहे. तीन महिन्यांचे आगाऊ भाडे तुम्हाला पाठवतो अशी बतावणी करून एका फ्लॅटधारकाला तब्बल 50 हजार रुपयांना चुना लावण्यात आला. दहा आणि 11 ऑक्टोबर २०२१ रोजी हा प्रकार घडलेला असून चार एप्रिल रोजी अमरावती शहर कोतवाली पोलिसांनी सायबर सेलच्या सांगण्यावरून गुन्हा नोंदवलेला आहे.
मांगीलाल प्लॉट या भागात राहणारे 63 वर्षीय ग्रहस्थ यांचा श्रीकृष्ण पेठ येथे एक फ्लॅट आहे. 10 ऑक्टोबर 2021 रोजी पुणे येथून मी अनिकेत काळभोर बोलत आहे असे सांगत त्यांनी आपण सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक आहेत असे देखील सांगितले. त्यानंतर फ्लॅट भाड्याने हवा म्हणून त्याने त्याचे ओळखपत्र आणि आधारकार्ड देखील पाठवले त्यानंतर आपल्या पगाराच्या खात्यातून 50 हजार रुपये तुम्हाला ऍडव्हान्स पाठवतो, असेही तो म्हणाला. गूगल पे अकाउंट त्याने सांगितले तसे हाताळताच तब्बल पन्नास हजार रुपये तक्रारदार यांच्या खात्यातून वजा झाले आणि त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव त्यांना झाली.
63 वर्षीय वृद्ध असलेले तक्रारदार यांनी 11 ऑक्टोबर रोजी आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि त्यानंतर सहा महिन्यांनी ही तक्रार शहर कोतवाली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. आपल्या खात्यावर पैसे घेण्यासाठी कोणताही कोड स्कॅन करावा लागत नाही तसेच कोणताही ओटीपी इतर कुठल्याही व्यक्तीशी शेअर करू नये. बँकेतून फोन आलाय म्हणून लगेच विश्वास न ठेवता सदर बँकेशी संपर्क साधावा. कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करु नये असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आलेले आहे .