मुंबईतील थरार .. प्रेयसी तिच्या ‘ चॉकलेट ‘ ला भेटायला आली मात्र पुढे घडले वेगळेच

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना मुंबई येथे उघडकीस आली असून पोलिसांनी तडीपार केलेल्या आरोपीला आपल्या प्रेयसीला भेटण्याचा मोह झाला तो तिला भेटायला आला मात्र त्याच वेळी त्याच्यावर इतर काही व्यक्ती देखील पाळत ठेवून होते मात्र केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून पोलिस वेळेवर पोहोचले आणि त्याचा जीव वाचविण्यात आला.

रविवारी रात्रीची हि घटना असून मुंबईतील अँटॉप हिल ते घोडपदेव या रस्त्यावर माफिया टोळीने प्रतिस्पर्धी असलेल्या सिद्धार्थ भोसले उर्फ चॉकलेट या तरुणाच्या अपहरणाचा प्लॅन केला आणि तो तडीस नेला मात्र पोलिसांनी देखील जीवाची बाजी लावत अपहरण केलेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली असून त्याच्यावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिद्धेश हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून परिसरात तो चॉकलेट नावाने फेमस आहे. त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो माटुंगा येथे आला असताना एका इमारतीजवळ वाहनातून आलेल्या चार जणांनी त्याला घेरले आणि मारहाण सुरू केली सोबत त्याची प्रेयसी देखील होती. ती नागरिकांना मदतीसाठी याचना करत होती मात्र तोपर्यंत हा प्रकार दोन पोलिसांनी पाहिला आणि कारवाई करेपर्यंत ते सिद्धार्थ याला घेऊन पसार देखील झाले . मारहाण होत आहे तो व्यक्ती सिद्धार्थ आहे याची पोलिसांना तोपर्यंत कल्पना नव्हती.

प्रेयसीच्या चौकशीतून तो आरोपी चॉकलेट असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाला दर्शन सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला किडनॅप केलेले वाहन कुठे गेले याचा शोध खबऱ्या मार्फत लावला आणि त्याला घोडपदेव तिथे एका सिमेंटच्या गोदामात किडन्याप करून ठेवण्यात आलेले असल्याची माहिती हाती आली. अवघ्या दोन तासात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याची सुटका केली. पोलीस पोहोचले त्यावेळी सिद्धार्थ याला या चार जणांनी अक्षरश: अर्धमेला करून ठेवला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी प्रफुल्ल पाटकर नावाच्या एक जणाला अटक केली तर इतर तीन जण पसार झालेले आहेत.


शेअर करा