मुंबईत खळबळ..धपकन काहीतरी खाली पडल्याचा आवाज झाला अन सुरक्षारक्षकाने पाहिलं तर ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नवी मुंबई परिसरातील नेरुळ येथे उघडकीला आलेली असून एका इमारतीच्या 17 व्या मजल्यावरुन महिलेने आत्महत्या केलेली आहे. महिला एकटीच घरी असताना खाली पडल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या तपासात सदर महिलेने नैराश्यातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

सोमवारी दुपारी नेरूळ सेक्टर 14 येथील एका इमारतीमध्ये हा प्रकार घडलेला असून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकाने त्याठिकाणी जाऊन पाहिले असता इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहणाऱ्या मीना प्रकाश जैन ( वय 51 ) या गंभीर अवस्थेत आढळल्या. त्या पडल्या की उडी मारली ? या बाबतचा उलगडा झाला नव्हता मात्र तपासात नैराश्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे .


शेअर करा