मुस्लिम समुदायाने स्वतःहून मशिदीवरील स्पीकर हटवले , म्हणाले की ..

शेअर करा

लाऊडस्पीकरवर अजानच्या आणि नमाजच्या आवाजामुळे त्रास होत असल्याचे अनेक जणांचे म्हणणे याआधी आपण ऐकले असेल मात्र पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीच्या इमामाने लाऊडस्पीकरवर नमाज पठण करण्याबाबत एक कौतुकास्पद निर्णय घेतला असून मुलांना अभ्यास करण्यास त्रास होऊ नये म्हणून नमाजसाठी लाऊडस्पीकरचा वापर बंद करण्यात आला आहे . मुस्लिम समुदायाचा हा निर्णय मोठ्या कौतुकाचा विषय ठरला असून इतरही धर्मियांनी त्याचे अनुकरण करण्याची चर्चा होऊ लागली आहे .

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला असून मुलांना शिक्षण घेताना अजानमुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. मशिदीने मुलांच्या शिक्षणासाठी जागा देखील दिली आहे. मुस्लिम समाजातील लोकांच्या या कामाचे सर्वजण कौतुक करत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी हा खूप स्तुत्य निर्णय असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

मशिदीचे इमाम नजीमुल हक म्हणतात की, “येत्या काळात आम्ही लाऊडस्पीकरशिवाय मशिदीत नमाज देऊ. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि मुलांना शाळेत शांततेने अभ्यास करता येणार आहे. मशीद प्रशासनाच्या या उपक्रमाचे मशिदीजवळील शाळेचे शिक्षक इंद्रनील साहा यांनी कौतुक केले असून “करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मशिदीमध्ये अजान आणि नमाजसाठी लाऊडस्पीकर न वापरण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,” असे म्हटले आहे .


शेअर करा