
परदेशातून वस्तू आयात करण्यासाठी करचुकवेगिरीसाठी कोण काय शक्कल वापरेल याचा भरवसा राहिलेला नाही, असाच एक प्रकार मुंबई येथे उघडकीस आला असून मेमरी कार्ड असल्याचे समजून चक्क साडेतीन हजार आयफोन मुंबईत हवाईमार्गाने आणण्यात आले होते. महसूल गुप्तचर यंत्रणेने तस्करांची ही आयडिया हाणून पाडली आणि 42 कोटी रुपयांचा आयफोनचा साठा जप्त केला.
आयात केलेल्या दोन खोक्यात हॉंगकॉंग येथून आयात केलेल्या दोन खोक्यांमध्ये मेमरी कार्ड आहे असे नमूद करण्यात आले होते. ही खोकी मुंबई विमानतळाच्या एअर कार्गो संकुलात आणले असता अधिकाऱ्यांना संशय आला म्हणून त्यांनी खोटी तपासून पाहायला सुरुवात केली. त्यावेळी त्यात तब्बल दोन हजारापेक्षा जास्त आयफोन, गुगल पिक्सल फोन आणि एप्पलचे स्मार्टवॉच यांचादेखील समावेश होता. मेमरी कार्ड असल्याचे भासवून हा माल मुंबईत आणण्यात आला होता. सीमा शुल्क कायदा 1962 अंतर्गत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आयातदारांची चौकशी सुरू आहे.
भारतात 13 सप्टेंबर 2021 पासून आयफोन तेरा हे मॉडेल विक्रीस उपलब्ध झाले आहे . त्याची मूळ किंमत 70 हजार इतकी असून अत्याधुनिक श्रेणीतील मॉडेलची किंमत एक लाख 80 हजारांपर्यंत आहे. भारतात परदेशातून मोबाईल आणायचा झाल्यास 44% सीमा शुल्क आकारले जाते त्यामुळे हा कर चुकवला गेल्यास निव्वळ 25 ते 30 हजार रुपये इतका नफा कमावता येतो त्यामुळे तस्करी व्यक्तींनी ही आयडिया लढवली असावी असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.