मैत्रीचा अपमान केला म्हणून चक्क 50 लाख रुपयांची कायदेशीर नोटीस

शेअर करा

देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून अनेक लग्नकार्यात नवरदेवाचे मित्र हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एका नवरदेवाने आपल्या मित्रांना लग्नाला बोलावले मात्र वरातीला बोलवायचे हे त्याच्या लक्षात आले नाही आणि त्यातून संतप्त झालेल्या मित्रांनी त्याला चक्क 50 लाख रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली असून मैत्रीचा अपमान केला आहेस त्यामुळे हा दंड तुला भरावा लागेल असे म्हटले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हरिद्वार परिसरातील बहादूर बाग गावातील ही घटना असून रवी असे या नवरदेवाचे नाव आहे. त्याच्या लग्नात त्याचा मित्र चंद्रशेखर आणि इतरही मित्र सहभागी झाले होते. लग्न पत्रिकेनुसार संध्याकाळी पाच वाजता वरात निघणार होती मात्र मित्र तिथे पोहोचले त्यावेळी वरात निघून गेल्याचे त्यांना समजले. सदर प्रकाराची आपल्याला माहिती मित्राने दिली नाही यामुळे चंद्रशेखर आणि त्याचे इतर मित्र संतप्त झाले आणि त्यातून त्यांच्या मनात आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाली.

मैत्रीचा अपमान केला आहेस असे म्हणत चंद्रशेखर आणि त्याच्या मित्रांनी नवरदेव रवी याच्यावर मानहानीचा खटला भरलेला असून फोन करून घटनेचे स्पष्टीकरण मागितले होते मात्र त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही उलट आता उशीर झालाय तुम्ही घरी जा असा देखील खोचक सल्ला दिला, त्यामुळे मित्रांचा तीळपापड झाला. मित्राच्या लग्नपत्रिका आम्ही वाटल्या, सर्व कार्य आम्ही वटवले मात्र वरातीच्या वेळी आम्हाला डावलले गेले अशा भाषेत संताप व्यक्त करत त्यांनी वकिलामार्फत 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आम्हाला दे असा खटला दाखल केलेला आहे.


शेअर करा