मोठा फौजफाटा घेऊन डान्सबारवर रेड तर केली मात्र हाती आली ‘ चिल्लर ‘

शेअर करा

महाराष्ट्रात डान्स बारमधील मोठे अर्थकारण हा एक चर्चेचा विषय असून या संकल्पनेस छेद देणारी एक घटना समोर आली असून मीरारोड येथील एका ऑर्केस्ट्रा धाडीत पोलिसांना चक्क चिल्लर हाती आल्याने या घटनेची परिसरात व पोलीस दलात जोरदार चर्चा सुरु आहे. मीरारोडच्या एका ऑर्केस्ट्रा धाडीत मात्र पोलिसांना केवळ २० रुपयांच्या २७ नोटाच सापडल्याने या कारवाईबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या सहाय्यक निरीक्षक तेजश्री शिंदे , सहाय्यक निरीक्षक कुटे व पथकाने २९ नोव्हेंबरच्या रात्री मीरारोडच्या शीतल नगर मधील यश ९ ह्या ऑर्केस्ट्रा बारवर छापा मारला होता त्यावेळी मंद प्रकाशात ४ महिला तोकडे कपडे घालून गाण्याच्या तालावर अश्लिल हावभाव करत मद्यपान करीत असलेल्या पुरुषांच्या आजुबाजूला नृत्य करताना आढळून आल्या होत्या.

३० नोव्हेंबर रोजी तेजश्री यांनी दिलेल्या फिर्यादीत, मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्या १५ जणांसह बारचा चालक व मालक अश्या एकूण १७ जणांना आरोपी केलेले आहे मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करताना जुजबी कलमं लावल्याची चर्चा तर आहेच मात्र महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आदी कायदाची कलमे का लावलेली नाहीत असा आरोप करत इतक्या मोठ्या ऑर्केस्ट्रा बारमधून केवळ ५४० रुपयेच पोलिसांना सापडले असल्याने याबद्दल वेगळीच चर्चा आता रंगू लागली आहे . कारवाईत केवळ ५४० रुपयांची रोकड आणि तेही फक्त २० रूपयांच्या नोटा सापडल्याने या कारवाईबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.


शेअर करा