मोदींची नक्कल अंगलट , श्याम रंगीलाला बारा हजारांचा दंड अन..

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हुबेहूब आवाज काढणारा कॉमेडियन शाम रंगीला हा आता वादात सापडलेला असून पंतप्रधान मोदी यांनी जंगलात जाऊन निलगायला खाऊ घातलेले होते. पंतप्रधान मोदी यांची कॉपी करत शाम रंगीला याने देखील अशाच स्वरूपाचा एक व्हिडिओ बनवला आणि तो युट्युबवर पोस्ट केला . सदर व्हिडिओमध्ये त्याने मोदी यांनी ज्या पद्धतीने नील गाईला खाऊ घातले त्याच पद्धतीने खाऊ घातले मात्र त्याला बारा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. वनविभागाने त्याच्या विरोधात कारवाई केलेली असून त्याला नोटीसही पाठवलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टायगर प्रोजेक्टला पन्नास वर्षे पूर्ण झाले म्हणून टायगर रिझर्व दौऱ्यावर ते गेलेले होते. कर्नाटक निवडणूक जवळ आली असल्याने मोदी यांच्या या भेटीचे चित्र गोदी माध्यमांनी चांगलेच रंगवले. मोदी यांनी डोक्यात हॅट घातलेली होती आणि त्यांच्या हातात दुर्बीण होती तर शाम रंगीला याने देखील अशाच पद्धतीने जयपूरच्या झालाना जंगलात भेट देऊन व्हिडिओ बनवलेला होता.

श्याम रंगीला याने बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडियात अवघ्या काही मिनिटात जोरदार व्हायरल झाला. नील गाईला खायला देणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 या नियमाचे उल्लंघन आहे असे म्हणत वनविभागाने त्याच्या विरोधात 12 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केलेली आहे सोबतच त्याला नोटीसही पाठवलेली आहे.

शाम रंगीला याने त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करून त्यामध्ये खोचकपणे , ‘ मी काही पंतप्रधान मोदी नाही त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे असे सांगत एकंदरीत माझी तब्येत पाहता निलगायनेच जंगलातून मला खायला आणून देणे भाग होते असे म्हटलेले आहे सोबतच निलगाईला ‘ मी तुला काहीतरी खाऊ घातलं होतं तू मला माफ कर मात्र त्यावेळी मी श्याम रंगीला नव्हतो ‘ असे देखील म्हटलेले आहे. त्याचा हा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियात पुन्हा जोरदार व्हायरल होत आहे .


शेअर करा