मोबाईल चोरताना धरल्यावर चोरट्याची ‘ वेगळीच ‘ धमकी

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून भाजी मंडई येथे मोबाईल चोरून पळत असलेल्या चोरट्याला पकडल्यानंतर त्याने ‘ जर माझा पाठलाग केला तर तुला संपवून टाकील ‘ अशी धमकी दिली आणि तो पळून गेला. सोलापूर जिल्ह्यात ही घटना घडलेली असून आरोपी निखिल कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उमेश दत्तात्रेय खाडे ( वय 24 राहणार कोळी गल्ली सोरेगाव उत्तर सोलापूर ) यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

झाले असे की, फिर्यादी खाडे हे आपल्या भावासोबत रविवारी सकाळी साडेनऊ वाजता भाजी मंडईत भाजी घेत होते त्यावेळी ते आपला आणि आपल्या नातेवाईकांचा मोबाईल एका पिशवीत ठेवून भाजी घेत असताना एक अनोळखी इसम फिर्यादी यांच्या हातातील पिशवीला हिसका मारून पळून जाऊ लागला. फिर्यादी आणि त्याच्या भावाने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पळून जात असताना तो निखिल कांबळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आपल्याला आता पकडले जाणार हे लक्षात आल्यानंतर आरोपी निखील कांबळे याने फिर्याद देण्यास चाकूचा धाक दाखवला आणि माझा पाठलाग केला तर खूपसून टाकील अशी धमकी देऊन 36 हजार पाचशे रुपये किमतीचे दोन मोबाईल जबरदस्तीने चोरून नेले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली आणि निखिल याच्या विरोधात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी संध्याकाळी सातच्या सुमारास त्याला बेड्या ठोकल्या आहेत


शेअर करा