..म्हणून ‘ त्या ‘ मांत्रिकाच्या पत्नी मुलगी आणि मुलावरही गुन्हा दाखल

शेअर करा

नाशिक येथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून आपल्या अंगात देवी शक्ती आहे असा दावा करत एका भोंदूबाबानं एका महिलेवर वारंवार अत्याचार केले आहेत. नाशिकच्या उपनगर भागात ही घटना उघडकीला आली असून या बाबासहीत इतर तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विष्णू काशिनाथ वारुंगसे असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित महिलेच्या घरी जाऊन तसेच इतर ठिकाणी वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आपल्यामध्ये दैवी शक्ती आहे असे भासवून त्याने या महिलेला जाळ्यात ओढले आणि तिला घर देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून सुमारे पाच लाख रुपये देखील त्याने उकळले होते.

सदर घटनेत आरोपी विष्णू याची पत्नी आणि त्याचा मुलगा मुलगी हे देखील सहभागी असल्याने त्यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सुनिता विष्णू वारुंगसे, उमेश विष्णू वारुंगसे आणि त्याची मुलगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर हे तपास करत आहे.


शेअर करा