..म्हणून मला कोणीच घर देईना , उर्फी जावेदचा खळबळजनक दावा

शेअर करा

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष चांगलाच चर्चेत आलेला असून उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना चक्क चित्रू म्हणून संबोधले होते. उर्फी जावेद हिच्या कपड्यांची आगळी-वेगळी फॅशन पाहून चित्रा वाघ भडकल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. उर्फी जावेदने आता पुन्हा एकदा एक वेगळाच दावा केलेला असून त्यामध्ये आपल्याला घर मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे.

उर्फी जावेदने केलेल्या ट्विटमध्ये ती म्हणते की, ‘ मी जे काही कपडे परिधान करते त्यामुळे मुस्लिम लोक मला घर देत नाहीत तर दुसरीकडे मी मुस्लिम असल्यामुळे हिंदू लोकदेखील मला घर देत नाही. उरलेले जे काही लोक आहेत ते मला मिळत असलेल्या राजकीय धमक्यामुळे घर देत नाही म्हणून आता मुंबईत भाड्याने राहणे मला मुश्किल झालेले आहे ,’ असे तिने म्हटले आहे. तिच्या या दाव्यावर आता वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे.


शेअर करा