रात्री बाराच्या सुमारास कुलूप तोडून विधवा महिलेच्या घरात आले अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात उघडकीला आली असून चक्क पन्नास वर्षीय विधवा मजूर महिलेवर दहा एप्रिलच्या रोजी रात्री बाराच्या सुमारास घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. अजय खारोडे ( राहणार आंबोडा तालुका आकोट ) आणि श्याम विश्वासराव आढाउ ( राहणार माळेगाव बाजार ) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकरणी पीडित विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 10 एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास दोन्ही आरोपी तिला अचानकपणे घरात आलेले दिसले यावेळी अजय खारोडे याने विधवा पीडित महिलेला तिच्या घरातील कुलूप तोडले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. महिलेने आरडाओरडा करायला म्हणून तिचे नातेवाईक गोळा झाले त्यावेळी आरोपी पळून गेले. पीडित महिलेने त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला असून तेल्हारा पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा