रेल्वेच्या डब्यात तोडक्या मोडक्या इंग्रजीत लिहलेली चिठ्ठी आढळली अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे रेल्वे स्थानकावर रात्री मुक्कामी थांबणाऱ्या एका ट्रेनच्या डब्यात तेवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली असून तोडक्या-मोडक्या इंग्रजी मध्ये लिहिलेली ही सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार योगेश घनश्याम उतरान कोरताम ( वय 23 राहणार कंपास पुरा बडनेरा ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून बडनेरा स्थानकावर असलेल्या एका मुक्कामी ट्रेनच्या डब्यात योगेश त्याने स्वतःच्या शर्टाने साखळीला लटकून गळफास घेतला. त्याच्याकडे इंग्रजी भाषेत लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली असून आपण स्वतःच्या खुशीने आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिलेले आहे. काही लोकांचे पैसे आपल्याला देणे आहेत याचा देखील त्यात उल्लेख आहे.

पोलिसांनी रेल्वे पोलिसांकडे सीसीटीवी फुटेज चेक केले असता रात्री साडेदहाच्या सुमारास तो इथे आल्याचे फुटेज मध्ये आढळून आले. रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पोलिस उपनिरीक्षक राजेश वरठे अधिक तपास करत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे योगेश याच्या वडिलांनी देखील अवघ्या दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती त्यातून तो नैराश्यात गेलेला होता.


शेअर करा