लस्सी पिण्यास प्राध्यापिकेला मॉडरेटर घेऊन गेला अन.. , आता प्रकरण पोलिसात

शेअर करा

महाराष्ट्रात पुणे येथे एक विचित्र घटना समोर आली असून पेपर तपासणीचे काम पूर्ण झाल्यावर लस्सी पिण्याच्या बहाण्याने एका महिलेला कात्रज डेअरी इथे घेऊन जात तिथे मिठी मारून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी मॉडरेटर विकास पवार ( राहणार आंबेगाव खुर्द ) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

कसबा पेठेत राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली असून फिर्यादी या प्राध्यापिका असून बारावीचे पेपर तपासण्याचे काम त्यांच्याकडे दिले होते. विकास पवार हा मॉडरेटर म्हणून काम करत होता त्यानंतर फिर्यादी यांना पेपर तपासण्याच्या कामात काही अडचण आल्यास त्या आरोपीला फोन करून विचारत असायच्या.

सोमवारी बारावीचे शेवटचे पेपर तपासून झाले त्यानंतर विकास पवार याने या महिलेला लस्सी पिण्यासाठी दुपारी अडीच वाजता कात्रज डेअरी इथे नेत त्याने त्यांचा हात हातात घेत त्यांच्या खांद्यावर हात टाकला यावेळी फिर्यादी यांनी त्याचा हात झटकला असताना त्याने फिर्यादी यांना मिठी मारून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्यांच्यासोबत केले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक थोरात हे पुढील तपास करत आहेत.


शेअर करा