विवाहित महिलेसोबत ‘आक्षेपार्ह ‘ अवस्थेत तरुण धरल्यावर गाव एकवटले

शेअर करा

देशात शुल्लक कारणावरून कायदा हातात घेणा-या लोकांचे प्रमाण वाढत असल्याची घटना बिहार येथे समोर आली असून मुंगेर जिल्ह्यात कुलतूपुर गावामध्ये एका विवाहित महिलेला भेटायला आलेल्या प्रियकराची गावकऱ्यांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर महिलेचे मयत व्यक्ती सोबत प्रेमसंबंध होते त्यातून तो तिला भेटायला आलेला असताना गावकऱ्यांच्या ताब्यात तो सापडला आणि त्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीचे नाव मोहनकुमार असल्याचे समजते. एका व्यक्तीच्या पत्नीसोबत मोहन कुमार याचे प्रेम संबंध होते धक्कादायक बाब म्हणजे सदर महिला ही चार मुलांची माता असून मोहन कुमार बर्‍याच दिवसांनी तिला भेटण्यासाठी गेला होता.

मोहन कुमार याच्या या प्रकरणाची गावात चर्चा होती मात्र दोघांना रंगेहाथ पकडण्यात आत्तापर्यंत गावकऱ्यांना यश आले नव्हते त्यामुळे मोहन कुमार गावामध्ये दिसताच गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी प्लॅनिंग केली. दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत गावकऱ्यांनी धरले. त्यानंतर विवाहित महिलेने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र मोहन कुमार याला गावकऱ्यांनी बेदम चोप दिला आणि महिलेला देखील मारहाण करण्यात आली. हात-पाय बांधून मोहनकुमार याला मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे ..


शेअर करा